Ad will apear here
Next
एस हॉस्पिटलतर्फे मोफत दंतचिकित्सा शिबीर
पुणे : एस हॉस्पिटलमधील दंतचिकित्सा विभागातर्फे २३ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत सकाळी १० ते दोन या वेळेत सर्वांसाठी मोफत दंतचिकित्सा व मुखरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये अत्याधुनिक उपकरणांद्वारे दंततपासणी, मुखरोग तपासणी, एक्सरे तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन इत्यादी सेवा उपलब्ध असतील. या शिबिरातील सहभागी रुग्णांना पुढील उपचारांमध्ये विशेष सवलतही दिली जाणार आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. शिबिरासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. 

नावनोंदणीसाठी संपर्क : ८४५९२ ९२८७७/ ०२०-२५४३४०६३/७२ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZIUCC
Similar Posts
फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’तर्फे वारकरी सेवा पुणे : फिनोलेक्स उद्योग समूह आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, फराळ वाटप व पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
डॉ. सरदेशमुख, डॉ. चंदनवाले, डॉ. फडे यांना धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान पुणे : ‘रूग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एकत्रित उपचार पद्धती हाच भविष्यकाळातील मार्ग असून, त्यासाठी सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येणे, ही काळाची व समाजाची गरज आहे,’ असे मत एस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले. आरोग्यभारती व एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
एस हॉस्पिटलमध्ये विशेष योग कार्यशाळा उत्साहात पुणे : येथील एस हॉस्पिटलमधील एस ट्रान्सडीसीप्लिनरी रिसर्च सेंटरमध्ये ओपल फाउंडेशनमधील अंध व अपंग विद्यार्थांसाठी विशेष योगासन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अंध व अपंग मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही पुण्यातील पहिलीच योग कार्यशाळा होती.
‘आरोग्यसेवा पोहोचविताना समग्र दृष्टीकोन महत्त्वाचा’ पुणे : ‘सात एप्रिल रोजी साजरा झालेल्या जागतिक आरोग्य दिवसाची संकल्पना युनिर्व्हसल हेल्थ केअर होती. भारताने आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून हे ध्येय साकार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पाऊल टाकले आहे, जेणेकरून सर्वांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात मदत होईल; मात्र हे करत असताना वैद्यकीय चिकित्सेमध्ये समग्र

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language